देवाने तिला आई बनवलं, पण १३ वर्षाच्या मुलाला काय माहित, जन्मदातीच जीव घेईल

देवाने तिला आई बनवलं, पण तिला आईपण जपता आलं नाही, आपल्या १३ वर्षाच्या मुलाला तिने अशा कारणावरुन संपवलं की तुम्ही त्याचा विचार देखील करु शकत नाही.

Updated: Feb 20, 2022, 06:41 PM IST
देवाने तिला आई बनवलं, पण १३ वर्षाच्या मुलाला काय माहित, जन्मदातीच जीव घेईल title=

पुणे  : देवाने तिला आई बनवलं, पण तिला आईपण जपता आलं नाही, आपल्या १३ वर्षाच्या मुलाला तिने अशा कारणावरुन संपवलं की तुम्ही त्याचा विचार देखील करु शकत नाही. महिलेने आधी आपण असं काहीही केलं नसल्याचं सांगितलं, पण पोस्टमार्टम रिपोर्ट आणि पोलिसांच्या  तपासानंतर सत्यसमोर आलं आहे, सत्य सर्वसामान्य माणसाला हादरवून टाकणारं आहे, पण या प्रकरणात आरोपी विद्या कदम ही खोटं बोलून हे प्रकरण शेवटपर्यंत दडपण्याचा  प्रयत्न करीत होती.

हा प्रकार पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडला आहे. या महिलेच्या अनैतिक संबंधात तिचा १३ वर्षाचा मुलगा आडवा येत असल्याने एकेदिवशी पहाटे ४ वाजता तिने त्याचा परकरच्या नाडीने गळा आवडला. त्यात झोपेत असलेल्या मुलाचा मृत्यू झाला, तो मुलगा तडफडत होता, सुरुवातीला तिने नारायणगावला एका खासगी दवाखान्यात मुलाला दाखल केलं, पण त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं, अखेर ७ दिवसांनी तिचा १३ वर्षाचा मुलगा दगावला.

मुलाची वैद्यकीय कागदपत्र मिळाल्यानंतर पोलिसांना घातपात झाला असल्याचा संशय आला. आरोपी विद्याने खोटी माहिती ससून रुग्णालयाला सांगून मृतदेह नेला आणि अंत्यसंस्कार केले.

अखेर पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर आरोपी विद्याने परकराच्या नाडीने मुलाचा गळा आवळल्याची कबुली दिली, या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.