मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 च्या उत्तर तालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीतर्फे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ही परीक्षा 11 सप्टेंबरला, पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा 25 सप्टेंबरला, राज्य कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा 15 ऑक्टोबरला, सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा 16 ऑक्टोबरला होणार आहे.
त्यामुळे मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.