MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 25, 2023, 11:27 AM IST
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज title=

MPSC Subordinate Services Job 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

एमपीएससी अंतर्गत  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब च्या एकूण 823 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) च्या 78 जागा,  राज्य कर निरीक्षक (गट-ब)  च्या 93 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) च्या 49 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) च्या 603 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासांठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी

टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. तसेच उमेदवारांकडे कामाचा 1 वर्षांचा अनुभव असावा. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांना मुंबई/खारघर येथे नोकरी करावी लागणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 18 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. 

उमेदवारांना मुलाखतीसाठी रुम नंबर 205, दुसरा माळा, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिलॉजी, अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22,खारघर, नवी मुंबई-410210 या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी नोकरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेच्या नंतर पुन्हा मुलाखतीचे सत्र आयोजित करण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना दिलेल्य दिवशीच मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. 

BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी