कल्याण : रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी पालिकेच्या कंत्राटदारानं चिखल आणि नित्कृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघड झालाय. कल्याणमधल्या चक्कीनाका परिसरातले खड्डे बुजवण्यासाठी ही धूळफेक कंत्राटदाराकडून केली जात होती.
कल्याणचे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अचानक केलेल्या पाहणीतून याचा भांडाफोड केला. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पालिका आयुक्तांना दोषी ठवरलं असून, आयुक्तांची कामाची मानसिकताच नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांतल्या रस्त्यांच्या कामांच्या चौकशीची मागणी करत, सर्वच दोषी कंत्राटदार आणि अधिका-यांवर कठोर कारवाईची मागणी श्रीकांत शिंदेंनी केलीय. दरम्यान मनसेनं हा संपूर्ण प्रकार म्हणजे स्टंटबाजी असल्याचं सांगत, श्रीकांत शिंदेंनी महापालिकेतल्या गोल्डन गॅंगसोबत येऊन पाहणी का केली असा प्रश्न उपस्थित केलाय.