हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, या प्रश्नांवर चर्चा कधी ?

 आजपासून कामकाज सुरळीत होतंय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Updated: Nov 26, 2018, 07:33 AM IST
हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, या प्रश्नांवर चर्चा कधी ? title=

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज दुसरा आणि शेवटचा आठवडा सुरु होतोय. पहिल्या आठवड्यात दोन सार्वजनिक सुट्ट्या आणि मराठा आरक्षण संदर्भातील मागासवर्ग आयोगाच्या अहवाल सादर करण्याच्या मागणीवर झालेल्या गोंधळानं कामकाज होऊच शकलं नाही. त्यामुळे आजपासून कामकाज सुरळीत होतंय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल, आणि दुष्काळाचे मुद्दे सरकर विरोधकांमध्ये समझौता होणे आवश्यक आहे.

या मागण्यांवर चर्चा 

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा होणार आहे.

विधानपरिषदमध्ये पुण्यातील होर्डिंग दुर्घटना प्रकरण, २०१५ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, तळोजा एमआयडीसी स्फोट प्रकरण अशा प्रमुख प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.

तर विधानसभेत वांद्रे पश्चिमेला नर्गिस दत्त झोपटपट्टीत आग लगाल्याचा मुद्दा, राज्यातील स्वाईन फ्लु आणि डेंग्युचा प्रश्न यावर चर्चा अपेक्षित आहे.