२० वर्षांचा असताना मित्राला संपवले, आता वयाच्या ४३व्या वर्षी अटकेत; तब्बल दोन दशकानंतर मुंबई पोलिसांना यश

Mumbai Police Arrest Accused After 20 Years: मुंबई पोलिसांनी तब्बल २० वर्षांनंतर आरोपीला अटक केली आहे. २००३च्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 5, 2023, 11:53 AM IST
२० वर्षांचा असताना मित्राला संपवले, आता वयाच्या ४३व्या वर्षी अटकेत; तब्बल दोन दशकानंतर मुंबई पोलिसांना यश title=
mumbai police arrest accused for 2003 murder after two decades

Mumbai Crime News: 20 वर्षांचा असताना हत्या करुन फरार झाला आता वयाच्या ४३व्या वर्षी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. २००३मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) दोन दशकापासून आरोपीच्या मागावर होती. मुंबईसह बिहारमध्येही (Bihar) त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी आरोपीला अटक करण्यात अपयश येत होते. अखेर वीस वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Mumbai Police Arrest Accused After 20 Years)

२००३मध्ये घडली होती घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची घटना २००३मध्ये विले पार्ले येथील नेस्ट हॉटेलमध्ये घडली होती. आरोपीचे नाव रुपेश राय असून त्याने दिल्लीतून आलेल्या दीपक राठोड नावाच्या व्यक्तीची हॉटेलमध्ये चाकू भोसकून हत्या केली होती. मयत दीपक याचा कपड्याचा व्यापार होता. त्यासंदर्भात तो मुंबईत आला होता. २००३मध्ये सांताक्रुझ पोलिसांनी हत्येच गुन्हा नोंदवला होता. कमिश्नर सत्यनारायण चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याचे नाव बदलले होते. तो अतुल केडिया नावाने लोकांमध्ये वावरत होता. त्याने झारखंड राज्यातून आधार कार्ड बनवून घेतले होते. तसंच, पासपोर्टसाठीही अर्ज केला होता. 

हॉटेलच्या रुममध्ये झाला होता वाद 

रुपेश आणि दीपक दोघेही दिल्लीतून आले होते. त्यांनी मुंबईत राहण्यासाठी एक रुम बुक केली होती. हॉटेलच्या रुममध्ये जेवत असताना दोघांमध्ये कोणत्यातरी विषयावरुन वाद झाले. यावेळी रागाच्या भरात रुपेश राय यांने दीपकवर चाकुने वार केले. या हल्ल्यात दीपक याचा मृत्यू झाला. 

हत्येनंतर १ लाख रुपये घेऊन पसार

दीपकच्या हत्येनंतर रुपेश रायने त्याच्या बॅगेतून १ लाख ३० हजार रुपये लंपास केले आणि फरार झाला होता. तेव्हापासून तो नाव बदलून वेगवेगळ्या राज्यात वावरत होता. मुंबई पोलिसांसह बिहार राज्याच्या पोलिसांनीही आरोपी दीपकचा शोध घेतला. मात्र, प्रत्येकवेळेस तो हातावर तुरुी देऊन पसार होण्यास यशस्वी व्हायचा. आरोपी दीपक राय हा बिहारमधील मुजफ्फरपुर येथील रहिवासी होता. पोलिसांनी तब्बल १६वेळा त्याच्या घरी छापेमारी केली मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. 

नाव बदलून फिरत होता

दीपकच्या हत्येनंतर पसार झालेला रुपेश त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात होता. त्याच्यावर २००१मध्ये दिल्लीतही एक गुन्हा नोंद होता. दीपक नाव बदलून गुजरात, गोवा, रांची, पुणे आणि भाईंदरमध्ये नोकरी करत होता. आरोपी रुपेश आणि दीपकची ड्रायव्हिंग ट्रेनिंगदरम्यान ओळख झाली होती. 

२० वर्षांनंतर अटक करण्यात यश

पोलिसांनी २० वर्षानंतर त्याला ठाण्यातील एका स्वीट मार्टमधून अटक केली आहे. इतकी वर्षे पोलिस त्याला अटक करु शकली नाही कारण तो दुर्गम भागात राहायचा. जिथे मोबाईलची रेंज मिळणंही मुश्कील व्हायचे. त्यामुळं पोलिसांच्य खबऱ्यांना त्याचे लोकेशन कळणे अवघड जायचे. आरोपी रुपेसला ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.