Mumbai- Pune : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. दर दिवशी या मार्गावरून नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास करत या दोन्ही शहरांमध्ये ये- जा करणं अनेकांच्याच सवयीचा भाग झाला आहे. यामध्ये रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गानं प्रत्येकजण सोयीप्रमाणे प्रवास करतो. पण, आता या प्रवासाचाही फटका शिळाला बसणार आहे.
मुंबई पुणे एक्प्रेस वेवरील (Mumbai–Pune Expressway) टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे. 1 एप्रिल 2023 हे नवे दर लागू होणार आहेत.
(Mumbai) मुंबई पुणे (Pune) एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येईल अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने (MSRDC) 2004 मध्ये काढली होती, त्याच धर्तीवर ही टोलवाढ होणार आहे.
टोल कितीने वाढणार?
वाहन | सध्याचे दर (रुपये) | नवे दर (रुपये) |
कार | 270 | 320 |
टेम्पो | 420 | 495 |
ट्रक | 580 | 685 |
बस | 797 | 940 |
थ्री एक्सेल | 1380 | 1630 |
एम एक्सेल | 1835 | 2165 |
बाबो! समृद्धी महामार्गावर टोलचे दर 1200 रुपये...
मुंबई- नागपूर 701 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांना जवळपास 1200 रुपये टोल भरावा लागणार आहे. हे आकडे ऐकून हा प्रवास जरा जास्तच महाग नाही? असा उपरोधिक प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या (samruddhi mahamarg ) पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण होणार आहे. ज्यानंतर मुंबई ते नागपूर हे 701 किलोमीटरचं अंतर वेगानं पार करता येईल.
या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार यासंदर्भात अधिकृत आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या टोलची माहिती देणारा बोर्ड महामार्गाच्या कडेला लावण्यातही आला आहे. त्या बोर्डवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात स्पष्ट सांगण्यात आलीये.
टोलचे दर 31 मार्च 2025 पर्यंत अर्थात पुढील तीन वर्षांसाठी लागू असतील, असंही या बोर्डवर नमूद करण्यात आलं आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे.