टेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला...

काळीज पिळवटून टाकणारी बातमी, कोणासोबत इतकं वाईट होऊ नये

Updated: Aug 22, 2022, 04:19 PM IST
टेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला... title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया मुंबई : आय टी विद्यार्थ्याने घराच्या टेरेसवर जात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 20 वर्षीय तरूणाने जीवन संपवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला?, याबाबत पोलीस तपास करत आहे. आनंद के. प्रशांत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. (IT student commits suicide)

आकाश नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेसात वाजता क्लाससाठी निघाला होता. घरातून बाहेर पडताना आकाश आई-वडिलांना 'बाय' म्हणाला त्यानंतर तो क्लाससाठी गेलाच नाही, आकाशने थेट टेरेस गाठलं. टेरेसवर गेल्यावर त्याने खाली उडी घेतली. इमारतीच्या टेरेसवरून उडी घेतल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती.

बिल्डींगमध्ये मोठा आवाज झाल्यामुळे हा प्रकार रहिवाशांच्या लक्षात आला, मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच आकाशचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आकाशने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली असावी त्याबाबतची अधिक चौकशी पोलीस आता त्याच्या मित्रांकडे करत आहेत.