डोळे वटारून बघितलं म्हणून तरुणाची हत्या

 शहरात 24 तासात दोन हत्या

Updated: Dec 29, 2021, 11:43 AM IST
डोळे वटारून  बघितलं म्हणून तरुणाची हत्या title=

नागपूर- शहरात  काही तासांच्या अवधीत विविध ठिकाणी हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. डोळे वटारुन का पाहतोस या कारणावरून एका तरुणाची हत्या तिथे करण्यात आली. अनिकेत तांबे असे मयत तरुणाचे नाव आहे .दुसरी घटना हिंगणा  पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.मित्रांसोबत शेतात ओलीपार्टी करायला गेलेल्या तरुणाची किरकोळ वादातून मित्रांनीच हत्या केली.धीरज माकोडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
   सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील मयत अनिकेत  सोमवारी रात्रीच्या सुमारास चुलत भाऊ आयुष तांबे आणि मित्र दीपक बुर्रेवार यांच्यासोबत गड्डीगोदाम परिसरात आला होता. तेथे त्याचा मित्र ऋषभ लोखंडे भेटले. अनिकेत व वृषभ हे एक दुसऱ्याला मैत्रीतून शिवीगाळ भाषेत बोलू लागले. यावेळी भूषण  सोमकुवरही तिथे होता.अनिकेत तांबेची आरोपी भूषण सोमकुवरसोबत डोळे वटारून काय बघतोस यावरून वाद झाला. यावरून दोघांमध्ये  तिथे हाणामारी झाली. त्यावेळेस मित्रांनी  त्यांच्यातील वाद सोडवला. मात्र थोड्याच वेळात भूषण सोमकुवर आणि जय सोमकुवर यांनी अनिकेतवर हल्ला केला. चाकूने त्याचा गळा चिरला.यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला.

 दारू पिताना झालेला  वाद बेतला जीवावर 

हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमगाव शिवारात सोमवारी रात्री दारू पिण्यावरून झालेल्या वादात धीरज माकोडे  याची हत्या झाली. धीरज सोमवारी  काही कामानिमित्त बुटीबोरीला गेला होता. त्यादरम्यान त्याचे मित्र हे  दारू, मटण घेऊन शेतात गेले होते.  त्यांनी शेतात जेवण करण्यासोबतच दारू प्यायला सुरुवात केली होती. धीरज हा उशिरा पोहोचल्याने त्याच्यासाठी थोडीच दारू शिल्लक राहिली होती. शिल्लक दारूही आरोपी मंगेश टोंगे हा पीत होता.धीरज ने त्याला दारू मागितली. या  कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.मंगेशने धीरजच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला.यामध्ये त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीय. आरोपी मंगेश टोंगे हा फरार आहे.