प्रेमप्रकरणातून नागपुरात तरुणाची हत्या

 एका आठवड्यात कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रेमप्रकऱणातून दुसरी हत्या

Updated: Aug 25, 2021, 08:08 PM IST
प्रेमप्रकरणातून नागपुरात तरुणाची हत्या title=

 नागपूर :नागपुरातल्या कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच आठवड्यात दुसरी हत्येची घटना घडली आहे...अमनदीपसिंग कुलदीपसिंग राजपूत असं मयताचं नाव आहे.प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाली आहे. गेल्याच आठवड्यात कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत म्हाड कॉलनीतच कमलेश बंडू सहारे नामक तरुणाची हत्या झाली होती. कमलेशची हत्या देखील प्रेम प्रकरणातून झाली  होती. अमनदीपसिंगच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र सम्यक बागडेला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

 मयत  अमनदीपसिंग कुलदीपसिंग राजपूत हा काल रात्री कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीच्या गल्ली नंबर 17मध्ये सम्यक नावाच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये एका तरुणीच्या विषयावरून जोरदार वाद झाला. त्यांच्यातील हा वाद बघता-बघता तका विकोपाला गेला.त्यावरूनच सम्यक बागडेने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने अमनदिपसिंग सपासप वर करणे सुरु केली.ज्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातच याच परिसरात कमलेश सहारे यांचीही प्रेमप्रकरणातून हत्य झाली होती. त्याल घटनेला एक आठवडाही होत नाही तर पुन्हा प्रेमप्रकरणातूनच अमनदीपसिंग राजपूरतची हत्याही प्रेमप्रकणातून झाली. हत्येच्या या घटनेची माहिती समजताच कपिल नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल देशमुख आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हत्या केल्यानंतर सम्यक बागडे घटनास्थळा वरून पसार झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला.  सम्यकचा शोध घेऊन घटनेच्या काही तासातच त्याला अटक केली आहे.