खासगी बस दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

सुरत - नागपूर महामार्ग भरती कोंडाईबारी घाटामध्ये खासगी बस दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला आहे. 

Updated: Oct 21, 2020, 08:58 PM IST
 खासगी बस दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

नंदूरबार : सुरत - नागपूर महामार्ग भरती कोंडाईबारी घाटामध्ये खासगी बस दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला आहे. एक जण जखमी झाला. या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की खासगी बसचा अक्षरश चक्काचूर झाला. या महामार्गावर ती भुसावळ पासून तर थेट नवापूरपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वाहनचालकांना खड्डेमय रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे या महामार्गावर ती अपघात हे नित्याचे झाले आहेत. या महामार्गाची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे. अपघाताला हेही एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पार्क केलेल्या कारला आग लावली

दरम्यान, नागपूरमध्ये पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशोकनगर परिसरात दोन गुन्हेगारांनी रात्रीच्या सुमारास एका फॉर्च्युनर आग लावली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. संतोष आहुजा यांची फॉर्च्युनर गाडी अशोकनगर परिसरात  मंगळवारी रात्री पार्क केली होती.

यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.. पाचपावली पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. मात्र नागपुरात सातत्यानं गुन्हेगारीच्या घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेची चिंता वाढवणा-या आहेत.