नागपुरातील 'आपली बस'ची 'रेड बस'सेवा ठप्प

सकाळपासून चाकरमान्यांसह  विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

Updated: Aug 10, 2018, 10:26 PM IST

नागपूर : आपली बस' या शहर बससेवेची  जाबादारी असलेल्या रेड बसची सेवा आज सकाळपासून बंद आहे..त्यामुळे सकाळपासून चाकरमान्यांसह  विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.सकाळपासून एकही रेड बस रस्त्यावर  न आल्यानं प्रवासी प्रचंड संताप व्यक्त करत आहे. आपली बसची  सेवा  पुरविणाऱ्या तीन ऑपरेटरर्सचे  थकबाकी न दिल्याने त्यांनी  रेड बससेवा आज सकाळपासून बंद ठेवली आहे.

बंद करण्याची नोटीस

महापालिकेची रे़ड बस चालवणा-या तिन्ही बस ऑपरेटने काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला थकबाकी न दिल्यास बससेवा  बंद करण्याची नोटीस दिली होती. दरम्यान महापालिकेच्या काही ग्रीन बसेस रस्तावर असल्या तरी त्यांचे दर सर्वसामान्य प्रवाशांना  परवडणारे नाही.