नागपूरचे डॉ. अमित समर्थ जगतल्या सर्वात लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत

नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ  ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत सहभागी होणार आहे.

Updated: Jul 11, 2018, 08:23 AM IST
नागपूरचे डॉ. अमित समर्थ जगतल्या सर्वात लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ  ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत सहभागी होणार आहे. रशियातील प्रतिकुल वातावरणात मास्को ते व्लादीवोस्टोक असं ९१०० किमी अंतर २५ दिवसांत १५ टप्प्यात पूर्ण करण्याचं अतिशय कठीण आव्हान या स्पर्धेत असते. या रेससाठी पात्र ठरलेले एकमेव भारतीय आहेत.

कठीण आणि आव्हानात्मक मानली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका ही पाच हजार किलोमीटरची सायकल रेस पूर्ण करत इतिहास घडवणारे डॉ. अमित समर्थ आता नवं आव्हान पेलणार आहेत. रशियातल्या ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम सायकल शर्यतीत ते सहभागी होणार आहेत. तब्बल ९१०० किलोमीटरची ही शर्यत स्पर्धकांचा स्टॅमिना आणि शक्ती याची परीक्षा पाहतो. यात सहभाग नोंदवणारे डॉ. अमित हे पहिलेच भारतीय असणार आहेत.

शिक्षणाने एमबीबीएस पण शरीरसौष्ठव स्पर्धेत विदर्भ श्री असा डॉ. अमित यांचा लौकीक. शरीरसौष्ठवपटू ते लांब पल्ल्याच्या शर्यतींचे सायकलपटू या प्रवासासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

शारीरिक आणि मानसिक पातळीवर कस पाहणाऱ्या ट्रायथलॉन, आयर्नमॅन या शर्यतीत डॉ. अमित यांनी यापूर्वीच आपला ठसा उमटवला आहे. मात्र आता ट्रान्ससायबेरियन एक्स्ट्रीमचं आव्हान अधिक खडतर आहे. नागपूरचे आयर्नमॅन त्यासाठी सज्ज आहेत. खडतर प्रशिक्षण घेत हे आव्हान पूर्ण कऱण्याच्या दिशेने त्यांनी कूच केलीय.