नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

नागपुरात एका महिलेला भरधवा कारने चिरडले. मात्र, 22 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 30, 2024, 09:52 PM IST
नागपुरात महिलेला कार खाली चिरडले;  ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार title=

Nagpur Hit And Run: पुण्याच्या अपघात प्रकरण ताजे असताना आता नागपुरात महिलेला कार खाली चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी केवळ नोटीस देऊन सोडून दिलंय. नागपुरात 7 मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चिरडून कार चालक पळून गेला होता. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर 3 आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी कार आणि दोषी चालकाचा शोध लावला. मात्र या महिलेला धडक देणा-या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिलं. त्यामुळे कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातंय. 

7 मे रोजी नागपूरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन अपघातात ममता आदमने या 45 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.  कार चालकाने त्यांना आणि धडक दिल्यामुळे आणि नंतर कार खाली चिरडल्यामुळे ममता यांच्या शरीरातील अनेक हाडे मोडली होती. शर्थीचे प्रयत्न करून अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला.  मात्र, अजूनही तीन महिने त्यांना अंथरुणावर राहावे लागणार आहे. अपघाताच्या तीन आठवडा नंतरही नागपूर पोलीस संबंधित कार आणि दोषी कारचालकाचा शोध लावण्यात यशस्वी ठरले नव्हते. 

नागपुरातील हिट अँड रन प्रकरणी दोषी कारचालकाला पोलिसांनी तब्बल 22 दिवसानंतर अटक केली. मात्र अवघ्या काही मिनिटातच त्याची सुटका केली... पोलिसांच्या या कृतीवर हीट अँड रन प्रकरणातील जखमी ममता आदमने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आधीच या प्रकरणात दिरंगाई केली आणि त्यानंतर आरोपी विरोधात कुठलीही कठोर कारवाई न करता त्याला सोडून दिले, हे योग्य नाही.. त्यामुळे मला न्याय मिळाले असे वाटत नसल्याचे मत ममता आदमने यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी थंड बस्त्यात टाकलेलं हिट अँड रन प्रकरण प्रसारमाध्मानी उचलून धरल्याचे लक्षात आल्यावर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोषी कारचालकाला शोधून काढले. खरोखरच पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या कारचालकाला शोधले आहे की त्या ठिकाणी दुसऱ्या एका व्यक्तीला उभे केले आणि नंतर त्याला सोडून दिले असा संशय ही ममता आदमने यांनी व्यक्त केला आहे..

नागपुरच्या  झेंडा चौकाजवळ कारचालक तरुणानं तिघांना उडवलं

नागपूर शहरातील दाटीवाटीच्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ कारचालक तरुणानं तिघांना उडवलंय...गंभीर बाब म्हणजे कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर 2 सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. तसंच गाडीत ड्रग्ज, दारूच्या बाटल्याही सापडल्यायत...कारचालकानं एक महिला, पुरुष आणि अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं असून, त्या बाळाची प्रकृती गंभीर आहे...पुण्याचं प्रकरण ताजं असतानाच नागपुरात ही गंभीर घटना घडलीय...पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून, तपास सुरू आहे...