मोबाईलचा नाद, जीवाला घात... ऑनलाईन चॅलेंज पूर्ण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

Nagpur : यूट्यूबवरील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 13 वर्षीय मुलगा शेजारच्यांच्या गच्चीवर गेला होता. बराच वेळ मुलगा परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्यांच्या गच्चीवर पोहोचताच मुलाच्या कुटुंबियांना धक्का बसला

Updated: Jan 28, 2023, 02:08 PM IST
मोबाईलचा नाद, जीवाला घात... ऑनलाईन चॅलेंज पूर्ण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आजच्या पिढीकडून गरजेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा (Electronic gadgets) वापर होत असल्याचे पाहायला मिळतं. काहींवर याचा गंभीर परिणामही दिसून येतो. मोबाईलवर (Mobile) असणारे व्हिडीओ पाहून त्याप्रमाणे कृती करण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र व्हिडीओत (YouTube Video) दाखवलेली कृती करण्याच्या नादात एका बालकाला जीव गमवावा लागला आहे. बालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपलं मूल मोबाईल घेऊन नक्की काय करत आहे याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाईलवर व्हिडिओ पाहून तशी कृती करण्याच्या नादात एका 13 वर्षीय बालकाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुरात (Nagpur News) घडली आहे.अग्रण्य बारापात्रे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. सोमवारी गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या स्थितीत अग्रण्यचा मृतदेह आढळून आला होता. अग्रण्यचा गळफास लावलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मोबाईलवरील एक चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अग्रण्याच जीव घेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अग्रण्य हा इयत्ता आठवीतील विद्यार्थी होता. लाठी-काठी चालवण्यात अग्रण्यने प्रावीण्य मिळवले होते. अग्रण्य हा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. यू-ट्युबवरील ‘स्कार्फ फेस कव्हर चॅलेंज’पूर्ण करताना अग्रण्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. अग्रण्यने पाहिलेल्या व्हिडिओत एखादी कृती करायचे आव्हान स्वीकारायचे व ते पूर्ण करायचे प्रयत्न केले जातात. हेच चॅलेंज अग्रण्यने घेतले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

25 जानेवारीच्या संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अग्रण्य शेजाऱ्यांच्या गच्चीवर खेळायला गेला होता. बराच वेळ तो परत न आल्याने त्याचे कुटुंबीय अग्रण्याला शोधण्यासाठी गच्चीवर गेले. मात्र तिथे पोहोचताच बारापात्रे कुटुंबियांना धक्का बसला. गच्चीवरील शिडीला अग्रण्यचा ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला होता. हे चॅलेंज करताना काहीतरी चुकल्याने त्याला गळफास बसला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे.

दरम्यान, अग्रण्याच्या मृत्यूमुळे त्याच्या आई- वडिलांवर मोठा आघात झाला आहे. यूट्यूबवरील असे व्हिडिओ तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पालकांनी आपले मुल मोबाईल वापरताना कोणते व्हिडिओ पाहत आहे याबाबत दक्षता ठेवण्याचे त्यांनी आवाहन केल आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कोणत्या शाळेतील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.