नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बाईक रॅलीदरम्यान भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते भिडले, नागपुरात तणावाचं वातावरण, व्हिडीओ

Updated: Aug 1, 2021, 02:58 PM IST
नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

अमर काणे, झी मीडिया नागपूर: सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याच्या उपराजधानी नागपुरातून येत आहे. नागपुरातील संघ कार्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. यामुळे नागपुरातील संघ कार्यालयाजवळ काही वेळ तणावाचं वातावरण होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा धक्कादायक व्हिडीओ झी 24 तासच्या हाती आला आहे. 

काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी बेरोजगारी आणि महागाई विरोधात बाईक रॅली काढली होती. ही रॅली काढत असताना त्यांनी संघाच्या मुख्य कार्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली. 

संघ मुख्यालयाशेजारी भाजप आणि युवा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. खरतर विशेष सुरक्षा व्यवस्था असलेल्या या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात काहीवेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

नागपुरातील बडकस चौक आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. भाजप आणि युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ झी 24 तासच्या हाती आला आहे.