वाघिणीच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ, असं हेरलं सावज : VIDEO

व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

Updated: Oct 26, 2021, 09:43 AM IST
वाघिणीच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ, असं हेरलं सावज : VIDEO  title=

मुंबई : वाघीण एका हरिणाची शिकार करण्यासाठी पाठलाग करणतानाचा  व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील तुरिया गेटचा हा व्हिडिओ आहे. सोमवारी सकाळी लगंडी वाघीणिला पेंच तुरिया गेटजवळू जाताना हरणांचा एक कळप जाताना दिसला. यामध्ये तिने आपलं सावज हेरलं आणि त्यानंतरचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

वाघीणिने कळपातील एक सावज हेरत एका हरणाचा शिकार करण्यासाठी  पाठलाग सुरू केला. वाघीण हरणाची शिकार करण्यासाठी  पाठलाग करतेय आणि हरिण जीवाच्या आकांताने पुढे पळत आहे असं दृश्य या व्हिडिओमध्ये चित्रित झाले आहे. वाघिणीचा शिकारीचा प्रयत्नाचा हा थरार तिथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांनी सफारी दरम्यान पाहिला. महत्त्वाच म्हणजे यापूर्वीही शिकारीची घटना तुरिया गेटवरून आलेल्या पर्यटकांच्या समोरच घटली. या शिकारी प्रयत्नाच्या घटनेचा व्हीडिओ आपण झी मीडियावर पाहु शकता

पुण्यातील हडपसरमध्ये बिबट्याचा हल्ला 

हडपसर, गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्या आला असून वॉकिंगला गेलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला आहे. या तरुणाला डाव्या बाजूला पंजे लागले असून जवळच्या यश हॉस्पिटल मधे नेले आहे. आता बिबट्या तिथे जवळपास असणाऱ्या पडक्या घरात किंवा झुडपात आहे असे नागरिक सांगतात. वन विभाग मदत रवाना होत आहे. संभाजी अटोळे आणि अमोल लोंढे हे दोघे मॉर्निंग वॉकला गेले होते.  त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतिचं वातावरण आहे.