Traffic Reward Offer : आता नागपुरात ट्रॅफिकचे नियम पाळल्यास वाहनचालकांना खास ऑफर देण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर जशी दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचप्रकारे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा खास उपक्रम राबवला जात आहे. हा ट्रॅफिक रिवॉर्ड एका अॅपच्याद्वारे देण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा, अशी ही ऑपर आहे. नागपुरात आता या वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना आता ट्रॅफिक रिवॉर्ड मिळणार आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होतेच मात्र त्यांनी नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक नियमांचे पालन करतात त्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने कोट्यावधींचे बक्षिसे उपलब्ध आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी Traffic rewards हा पथदर्शी उपक्रम नागपुरात राबविण्यात येतोय. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येतोय. ट्रॅफिक रिवॉर्ड्स या पथदर्शी प्रकल्पात नागरिकासाठी ॲपद्वारे 35 कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस देण्यात येतील. शंभराहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड घेण्यासाठी हे पॉइंट वापरले जाऊ शकतील.सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि.ने संपूर्ण संकल्पना महापालिका आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मदतीने आकारास आणली.
या प्रकल्पांतर्गत जवळपास एक लाख ट्रॅफिक रिवॉर्ड्स टॅगचे वितरण वाहनचालकांना करण्यात येणार आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिक रिवॉर्ड्सचा (TrafficRewards) टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. सध्या ही यंत्रणा नागपुरात 10 सिग्नलवर लावण्यात आलेली आहे . काही आकर्षक बक्षिसांमध्ये बीपीसीएल पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल यासह विविध ब्रँडवरील इतर आकर्षक ऑफर्स यांचा समावेश आहे. या ॲपवर सध्या 35 कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. व्हीएनआयटी यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे.
रिवॉर्ड्स मिळविण्यासाठी वापरकर्त्याला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून ट्रॅफिकरिवॉर्ड्स (TrafficRewards)ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांचे तपशील नोंदवावे लागतील. जेव्हा हा टॅग असलेले वाहन लाल सिग्नलवर थांबेल, तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅग ला स्कॅन करेल व नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या अँपमध्ये 10 पॉइंटस मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचे पालन केल्यावर पॉइंटस मिळतील. हे गोळा केलेले पॉइंट बीपीसीएलयासह 100 हुन ब्रँड सोबत रिडीम केले जाऊ शकतात.