मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रत्नागिरी पोलीस ठाण्यात अटकेची कारवाई सुरू झाली आहे. कोणत्याच क्षणी नारायण राणेंना अटक होऊ शकते. रत्नागिरी पोलीस नारायण राणेंना ताब्यात घेणार आहे. नाशिक पोलिसांनी दिली माहिती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे. नारायण राणेंच्या संकटात वाढ होऊ शकते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नाशिक, पुणे, महाडसह अनेक ठिकाणांहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण राणे यांना अटक होणार का? याकडे साऱ्यांच लक्ष आहे.
न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता राणेंना नेमकी कुठून अटक होणार? याकडे साऱ्यांच लक्ष आहे. नारायण राणेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. रत्नागिरी कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. राणेंना रत्नागिरीतच अटक होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणेंवर 4 ठिकाणांहून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्याचं म्हटलं जातं आहे.