close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोठी बातमी । राणे भाजपात प्रवेश करणार, 'स्वाभिमान पक्ष' विलिन करणार

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत.

Updated: Aug 29, 2019, 09:30 PM IST
मोठी बातमी । राणे भाजपात प्रवेश करणार, 'स्वाभिमान पक्ष' विलिन करणार

मुंबई : गेले अनेक महिने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे काय होणार याचीच चर्चा होती. मात्र, ते आता रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. राणे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांचीच दिली. 

राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबर रोजी नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलिन करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी राणे यांनी आपण १० दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. भाजपासोबत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याते त्यांनी म्हटले होते. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राणेंनी भाजप प्रवेश केल्यास कोकणातील राजीकय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत. राणे भाजप प्रवेश करतील या चर्चांनी जिल्यातील अनेक जण बिथरल्याची चर्चा आहे. मात्र, राणे यांनीच भाजपमध्ये प्रवशे करणार असल्याचे जाहीर केल्याने राणेंचे काय होणार, यावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे राणेंना पक्षात घेऊन भाजपने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे. राणेंचा पक्ष प्रवेश हा शिवसेना विरोधामुळे लांबला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे.

कोकण आणि राणे अस समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा मोठा भूकंप कोकणात झाला त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये स्थिरावले. राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग काँग्रेसमय झाला. मात्र राणेंनी भूमिका पुन्हा बदलली आणि त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र दोन वर्षातच राणेंची भूमिका परत बदलली आहे. आता राणे भाजपवासी होणार आहेत. साहजिकच जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहेत. मात्र या बदलत्या परिस्थितीत राणे विरोधी असलेल्या काही नेत्यांचा सूर आता बदलू लागला आहे.

नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याने सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो. कारण शिवसेना - भाजप एक झाल्याशिवाय राणेंचा सामना करणे शिवसेनेला शक्य नाही. राणेच भाजपमध्ये गेल्यास सेनेला गणित बदलावी लागतील एका बाजूला भाजपची राणेंबाबतची सॉफ्ट भूमिका पाहून दीपक केसरकर मात्र पुन्हा आक्रमक झाले आहेत.

राणे भाजपृमध्ये गेल्यास राणे सोबत असलेले काही पदाधिकारी शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. यात कणकवली आणि सावंतवाडीमधील प्रमुख नेत्यांचा समावेश असू शकतो.