close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार

मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.   

Updated: Apr 5, 2019, 08:10 PM IST
मोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार

 

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीका शरद पवारांनी केली. मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवगाव येथे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवारी संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत पवार यांनी मोदी आणि भाजप सरकारचा चांगलाच समचार घेतला. 

Those asking Muslims to 'go to Pakistan' are ignorant about both Pakistan and India: Sharad Pawar

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थित करण्यात आला. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यासभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केल. मोदी माझं बोट धरून राजकारण करत असल्याचं सांगतात मात्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, असे सांगत मोदी सरकारने अनेक योजना आणल्या. मात्र योजनांचा पैसा जाहिरातीवर खर्च केला, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला. 

पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यानंतर भारत सारकारने चोख उत्तर दिले इतकेच नाही तर पाकिस्तान मधून अभिनंदन याची सुटका देखील केली. मात्र 56 इंचाची छाती फुगवून अभिनंदनच्या सुटकेचा श्रेय मोदी घेतात तर मग कुलभूषण जाधव यांना का सोडू शकले नाहीत, असा सवाल करत यावर मात्र मोदी बोलत नसल्याचं देखील पवार यांनी म्हटले.