योगेश खरे झी मीडिया नाशिक: एकीकडे पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना नाशिक आणि कोल्हापुरात मात्र चिंता कायम आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मात्र मृत्यूची नोंद धक्कादायक आहे. नाशिकमध्ये मृत्यूदर 1.31 टक्क्यांवरून 1.39 टक्के झाला आहे . मृतांच्या या आकडेवारीवरून राजकारण चांगलेच तापलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाने मृतांचे आकडे लपविल्याचा आरोप खरा असल्याची शंका आता खरी असल्याचं हळूहळू उलगडत आहे. हे आकडे थोडेथोडके नसू मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने सगळेच थक्क होत आहेत .
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना , याच आकडेवारीतील सावळा गोंधळ समोर येत आहे. गुरुवारी एकाच दिवशी एकूण २७० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद केल्याचं समोर आलं . यातील २६० मृत्यू हे मागील काळातील असल्याचेप्रशासनाकडून सांगण्यात आले . त्यानुसार मृत्यूची संख्या प्रत्यक्षात वाढताना दिसत आहे .
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी
11 जून- 214
12 जून- 333
13 जून- 510
निमशासकीय रुग्णालयांनी पोर्टलवर केली आहे . यापूर्वीही ८ व ९ जून रोजी ५७ व ७२ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली होती . सात दिवसांत पोर्टलवर नोंदविल्या गेलेल्या मृत्यूंची संख्या पंधराशेच्यावर आहे . आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार ४३० व्यक्ती कोरोना संसर्गामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे . यावरून गदारोळ उडाल्यावर आरोग्य विभागाने या दिरंगाईस खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांकडे बोट दाखवलं आहे.
गेल्या 24 तासांतील देशातील कोरोनाची आकडेवारी
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. 76 दिवसांनंतर आज अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत 62 हजार 597 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 1452 कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 2 कोटी 95 लाख 70 हजार 35 वर पोहोचला आहे.