पोलिसांशी पंगा घेणं गुंडांना असं पडलं महाग

आरोपींनी नाशिकमधल्या पंचवटी भागातल्या सिद्धी टॉवर या इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडले.

Updated: Oct 27, 2018, 09:35 PM IST
पोलिसांशी पंगा घेणं गुंडांना असं पडलं महाग

नाशिक :  पोलिसांशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव नाशिकमधील एका गुंडाला आला. तीन खुनातील संशयित आरोपी जया दिवे याची २५ ऑक्टोंबरला जामिनावर सुटका झाली. म्हणून त्याच्या साथीदारांनी नाशिकमधल्या पंचवटी भागातल्या सिद्धी टॉवर या इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडले. तसंच फटाके गच्चीवरून रस्त्यावरही फेकले.

पोलिसांनाच शिवीगाळ 

याचा त्रास नागरिकांना झाल्याने त्यांनी याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

पोलीस तातडीनं घटनास्थळी आले. मात्र जया दिवे आणि त्याच्या साथीदारांनी थेट पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

पोलिसांनी या प्रकरणी दिवेसह आठ आरोपींवर गुन्हे दाखल केले.

तसंच या सर्वांना बेड्या ठोकून त्यांची परिसरातून धिंड काढली.