चाणाक्ष अधिकारी करतील गुन्ह्याचा तात्काळ उलगडा

रोजच्या रोज कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, दंगली, आंदोलनं, मंत्री व्हीआयपींचा दौरा असल्या गोष्टींशी या पथकाचा काहीही संबंध येणार नाही. 

Updated: Aug 28, 2017, 09:24 PM IST
चाणाक्ष अधिकारी करतील गुन्ह्याचा तात्काळ उलगडा title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक पोलिसांनी खुनाच्या प्रलंबित गुन्ह्यांची उकल तातडीने व्हावी यासाठी स्पेशल स्क्वॉडची स्थापना केलीय. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. 

 रोजच्या रोज कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, दंगली, आंदोलनं, मंत्री व्हीआयपींचा दौरा असल्या गोष्टींशी या पथकाचा काहीही संबंध येणार नाही. 

पोलीस दलातीलच काही चाणाक्ष अधिकारी हेरून ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली आहे.  यापुढे जिल्ह्यात जिथे जिथे खुनाच्या घटना घडतील  तिथे हेच पथक दाखल होणार आहे. 

एक  वरिष्ठ अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या या पथकावर सन २०१६ मधील ७ तर २०१७ मधील ३ खुनाच्या गुन्ह्याचा शोध  लावून  आरोपींना बेड्या ठोकण्याचे मोठं आव्हान आहे. 

ग्रामीण भागाच्या तुलनेत नाशिक शहरात सातत्याने खुनाच्या घटना  घडताय. यातले काही खून उघडकीस आलेले नाहीत. सहायक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तपास होत असून त्यांना इतर विभागांचीही जोड मिळत असल्याचा दावा शहर पोलीस करत आहेत. 

रोजच्या रोज घडणारे गुन्हे, भर दिवसा होणारे खून, सशस्त्र टोळक्यांचा हौदोस नाशिक पोलिसांची कर्तबगारी दाखवून देते. आता नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या या स्पेशल स्क्वॉडला तरी गुन्ह्यांची उकल करणं जमतंय का याची उत्सुकता नाशिककरांना आहे.