योगेश खरे, झी 24 तास नाशिक : आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील देऊन अवघे 10 दिवस उलटले. त्यानंतर पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बंद करण्याची वेळ आली आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळताच नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं.
नाशिकमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित कऱण्यात आली होती. या शर्यतीमध्ये एक बैल आणि एक घोडा जुंपून शर्यत लावण्यात आली होती. इतकच नाही तर काही बैलगाडा मालकांनी या शर्यतीसाठी आपले बैल जुंपले होते.
नेमकं काय घडलं?
ओझरमध्ये बैलगाडा शर्यत पोलिसांनी थांबवली आहे. पोलिसांनी ही शर्यत बंद पाडली आहे. या शर्यतीला प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली होती. याशिवाय या स्पर्धेला पोलिसांचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. एकीकडे ओमायक्रॉनचा धोका असताना दुसरीकडे अशाप्रकारे गर्दी करणं धोक्याचं आहे. त्यामुळे पोलिसांनी ही स्पर्धा बंद पाडली.
बैलगाडा शर्यत थांबवण्यामागे नेमकं कारण काय?
प्रत्येक बैलाची धावण्याची क्षमता ही वेगळी असते. मात्र तरीही एकाच वेळेस दोन्ही बैलांना जोरात धावण्यास प्रवृत्त केलं जातं. न्यायालयाने फक्त बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली होती. त्यानंतरही ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.
बैलंही जोरात धावत होती. त्यामुळे थोडक्यात अपघात होता होता वाचला. तसेच मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे आव्हानत्मक होतं. तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजकांनी कुठल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती.
कोरोना आणि बैल गाडा शर्यतींच्या नियमाची पायमल्ली झाली होती. त्यामुळे अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार आता स्थानिक पोलिस आयोजकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं समजत आहे.
पोलिसांनी बघ्यांना तिथून निघून जावं, अन्यथा तुमच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असं त्यांना सज्जड दम देण्यात आला आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजकांनी कुठल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती.