तिघींना जिवंत पेटवून देणाऱ्या आरोपीचा पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा

सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी

Updated: Aug 10, 2018, 12:41 PM IST
तिघींना जिवंत पेटवून देणाऱ्या आरोपीचा पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा

नाशिक : पंचवटी परिसरातील अनैतिक संबंधाच्या वादातून तिघींना पेटवून दिलेल्या प्रियकराने पोलिसांना गुंगारा देत रेल्वेतून उडी मारून पलायन केलंय. मथुराहून नाशिकला येत असताना रेल्वेचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत पलायन केले. त्याला पकडण्यासाठी गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकानंदेखील संशयिताला पकडण्यासाठी रेल्वेतून उडी मारल्याने तेदेखील जखमी झाले आहेत. 

जलालुद्दीन खान या आरोपीला ९ महिन्यांची मुलगी, तिची आई आणि आजी या तिघांच्या क्रूर हत्येप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. अनैतिक संबंधाच्या वादातून जलालुद्दीननं या तिघींना जिवंत पेटवून दिलं होतं. त्यानंतर, पोलिसांना गुंगारा देऊन तो मथुरेला पळून गेला होता. 

अधिक वाचा : आजीच्या अनैतिक प्रेमसंबंधात निष्पाप नातीचा बळी

हे समजल्यानंतर पोलिसांच्या एक टीमनं मथुरेला जाऊन जलालुद्दीन खानला हुडकून काढलंच... परंतु, मथुरेहून पुन्हा नाशिकला आणताना आरोपीनं चालत्या गाडीतून खाली उडी मारली... त्याला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनीही उडी मारली... या घटनेत ते जखमी झालेत... तर जलालुद्दीन खान पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला.