नवी मुंबई : नवी मुंबईत घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोनं परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा केलीय. सिडकोने एकाच वेळी तब्बल १४ हजार ८३८ घरांची मेगालॉटरी काढलीय. या लॉटरीचा फायदा आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी होणार आहे. या घरांच्या किंमती १८ लाख ते २६ लाखांपर्यंत असतील. १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून http://lottery.cidcoindia.comया संकेतस्थळावर जाऊन इच्छुक घरांसाठी नोंदणी करु शकतात.
इच्छुकांना १६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा २५ हजार प्रतिमहिना तर अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा २५ हजार ते ५० हजार प्रतिमहिना ठेवण्यात आलीय. ५० हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.