नवी मुंबई : फिफा अंडर १७ वर्ल्डकपसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. फिफाचे पाच सामने नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. त्याच बरोबर या सामान्यांच्या सरावासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चांगले मैदान पालिकेच्या माध्यमातून नेरुळ येथे तयार करण्यात येणार आहे.
वाशी आणि नेरुळ या दोन ठिकाणी जागतिक दर्जाचे खेळाडू सराव करणार आहेत. नवी मुंबई मध्ये सामने होणार असल्याने जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक हे सामने पहायला येणार आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे चित्र जागतिक पातळीवर उत्तम जावे यासाठी पालिका सज्ज होत आहे.
शहरातील पाम बीच रोड, सायन-पनवेल हायवे, ठाणे - बेलापूर हायवेचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पार्कीगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नवी मुंबई शहराचं आगरी कोळी समाजचं कल्चर देखील मांडण्यात येणार आहे.