वाशी टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांची दादागिरी, कारमधील प्रवाशाला बेदम मारहाण

 नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर कारमधील प्रवाशाला पोलिसाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ समोर आला आहे. 

Updated: Nov 23, 2021, 10:04 PM IST
वाशी टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांची दादागिरी, कारमधील प्रवाशाला बेदम मारहाण title=

मुंबई : पोलीस यंत्रणा ही नागरिकांच्या सेवेसाठी असते त्यांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. बहुतांश जणांना पोलिसांबाबतचा अनुभव हा वाईट असतो. याला वाहतूक पोलिसही अपवाद नाहीत. पोलिसांच्या अशाच वाईट वागणुकीचा अनुभव एका प्रवाशाला आलाय. नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर कारमधील प्रवाशाला वाहतूक पोलिसाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांवर टीका केली जात आहे. (navi mumbai traffic police dadagiri on citizen at vashi toll plaza video viral)

नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहतूक पोलीसांची दादागिरी पहायला मिळाली. कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला वाहतूक पोलीसाने बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडोओ समोर आला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजताची घटना घडली आहे. कार चालकाचा गुन्हा असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. 

भर रस्त्यात अशी मारहाण करण्याचा पोलीसांना कुणी अधिकार दिला? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित केला जातोय. दरम्यान या मुजोजर पोलिसावर काही कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.