शिवसेनेविरोधात भूमिका घेणाऱ्या नवनीत राणा यांचे मंत्री आदित्य ठाकरे यांना 'या'साठी पत्र

शिवसेनेविरोधात (Shiv Sena) नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आता नवी मागणी केली आहे. ही मागणी शिवसेनेसाठी खास असणार आहे. 

Updated: Jun 24, 2021, 09:52 PM IST
शिवसेनेविरोधात भूमिका घेणाऱ्या नवनीत राणा यांचे मंत्री आदित्य ठाकरे यांना 'या'साठी पत्र

अमरावती : शिवसेनेविरोधात (Shiv Sena) नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आता नवी मागणी केली आहे. ही मागणी शिवसेनेसाठी खास असणार आहे. नवनीत राणा यांनी अशी मागणी केल्याने शिवसेनेतूनही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी ही मागणी का केली, याचीही चर्चा होत आहे. दरम्यान, आपल्या मागणीचे पत्र मंत्री आदित्य ठाकरे  ( Aditya Thackeray) यांना लिहिले आहे.

अमरावती (Amravati) जिल्ह्यात मेळघाटातल्या (Melghat) चिखलदरामध्ये स्कायवॉक बांधला जात आहे. या स्कायवॉकला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केलीय. यासंदर्भात त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. (Navneet Rana's letter to Aditya Thackeray ) नवनीत राणा यांची कायम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भूमिका राहिली आहे. असे असताना राणा यांच्या या मागणीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.