Jitendra Awhad Cuts 50 Khoke Cake: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आज वाढदिवस (Eknath Shinde Birthday) आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेचे समर्थक सेलिब्रेशन (Eknath Shinde Birthday Celebration) करत आहेत. ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदेंनी आज वाढदिवशीच कोपरी पुलाचं उद्घाटन केलं आहे. यादरम्यान ठाण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी कापलेल्या केकची जोरदार चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी '50 खोके' लिहिलेला केक कापत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील एका स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला उपस्थित होते. या कार्यकर्त्याच्या केकवर ५० खोके, एकदम ओके, गद्दार फॅमिली असं लिहिलं होतं. योगायोग म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आव्हाडांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेंद्र विनायक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड मुंब्र्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्याने विनंती केल्याने जितेंद्र आव्हाड यांनी हा केक कापला.
जितेंद्र आव्हाड यांनी केक कापलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या केकच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंच्या बंडखोरीवर टीका केली आहे. "मी केक नव्हे तर खोक्याचं कटिंग करत आहे. खोक्यामध्ये धोका आहे आणि त्याच खोक्यात बोका आहे," अशी टीका यावेळी त्यांनी केली.
वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांना प्रताप सरनाईक यांनी चांदीचा धनुष्यबाण भेट म्हणून दिला आहे. एकीकडे धनुष्यबाण कोणाची ही लढाई सुरू असताना दुसरीकडे सरनाईक यांनी अशी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीला महामोदक अर्पण करण्यात आला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. कार्यकर्त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
मी एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) मैत्री होती हे नाकारत नाही. पण माझ्यावर 354 लावण्यात आलं आणि त्यावर त्यांनी माझा काही संबंध नाही म्हटलं तेव्हा मला कुठेतरी पाणी मुरतंय हे कळून चुकलं होतं. तेव्हा मला आपण अलर्ट व्हायला हवं असं वाटलं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे संबंध का बिघडले असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की "ते मलाही समजलं नाही. मी त्यांना विचारण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी जे उत्तर मला दिलं होतं ते महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे. माझ्यासोबत असं का केलं विचारलं असता ते म्हणतात, अरे जितेंद्र मी कुठे केलं. तुला माहिती आहे ना ते कोण करतं".