अजित पवार यांचे भाचे भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता.

Updated: Aug 29, 2019, 05:59 PM IST
अजित पवार यांचे भाचे भाजपच्या वाटेवर?

उस्मानाबाद : राष्ट्रवादीला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भाचे राणाजगजितसिंह पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पाटील यांनी एक फेसबूक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना तुम्हाला काही सांगायचं असल्याचं देखील म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

३१ ऑगस्ट रोजी परिवार सवांद नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्याना केले आहे. या परिवार सवांद कार्यक्रमामध्ये ते राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा करु शकतात. १ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अमित शहा यांच्या हस्ते किंवा ५ सप्टेंबरला मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपमधील मेगा भरतीचा मुहुर्त ठरला आहे. सप्टेंबरचा पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यात ही मेगा भरती होणार आहे. एक सप्टेंबरला महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप हा सोलापुरला होत असून भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह या समारोपाला उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये विरोधी पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरला मुंबईत अशीच एक मोठी मेगाभरती होणार असून यानिमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील कोणते मोठे नेते भाजपच्या गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the Author