शशिकांत पाटील, झी मीडिया,लातूर: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड यांनी आपली उमेदवारी परत घेत राष्ट्रवादीला तोंडघशी पाडलं होतं. तेच रमेश कराड भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्यासोबत त्यांच्या लातूरच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा' करीत आहेत. त्यांच्या भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे झी मीडियाने दूरध्वनी द्वारे या भेटीचे सत्य जाणून घेतले. त्यावेळी कराड यांनी या भेटीला दुजोरा दिला.
लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद निवडणुकीसाठी कराड हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पण, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत कराडांनी राष्ट्रवादीचा गेम केला. दरम्यान, कराड यांनी धस यांना विजयासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कारही केला. रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून त्यानंतर उमेदवारी अर्ज का परत घेतला याचे स्पष्टीकरण ही दिले नाही. ते माध्यमांनाही सामोरे जात नाहीत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपमधून आलेले रमेश कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झाले होते. मात्र उमेदवारी परत घेण्याचा दिवशी रमेश कराड यांच्या आपला उमेदवारी अर्ज आश्चर्यकारक रित्या परत घेतला होता. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश कराड यांच्या या भूमिकेमुळे मोठा राजकीय भूकंप झाला होता. आता तेच रमेश कराड भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्यासोबत त्यांच्या लातूरच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा' करीत आहेत. त्यांच्या भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे झी मीडियाने दूरध्वनी द्वारे या भेटीचे सत्य जाणून घेतले. त्यावेळी रमेश कराड यांनी या भेटीला दुजोरा देत सुरेश धस हे प्रचारासाठी लातूरमध्ये आल्यानंतर त्यांना चहाला बोलविल्याचे रमेश कराड यांनी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आलेले सुरेश धस यांनी रमेश कराड यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रमेश कराड यांनीही कसले किंतु परंतु न घेता सुरेश धस यांची भेट तर घेतलीच. याशिवाय त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार ही केला. त्यांनतर सुरेश धस यांना चहा पाजवीत 'चाय पे चर्चा'ही केली. रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून अद्याप उमेदवारी अर्ज का परत केला याचे स्पष्टीकरण ही दिले नाही. ते माध्यमांनाही सामोरे जात नाहीत. त्यात ते लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार यांना सहज भेटत असल्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.