close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धक्कादायक, रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून कडुनिंब पाल्याची वाहतूक

कडुनिंबाच्या पाल्याची रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून वाहतूक.

Updated: Aug 22, 2019, 06:12 PM IST
धक्कादायक, रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून कडुनिंब पाल्याची वाहतूक
संग्रहित छाया

पुणे : कडुनिंबाच्या पाल्याची रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हावडा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मिलिंद मोरे या प्रवाशाने त्यांच्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला आहे. झारखंडमधून पुण्यात येणाऱ्या हावडा एक्स्प्रेसच्या स्वच्छतागृहात कडुनिंबांच्या पाल्याची वाहतूक केली जात होती. रेल्वेगाडीतून कडुनिंबाच्या पाल्याची अशाच पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचं प्रवाशांनी सांगितले.

दरम्यान, आणखी एक रेल्वेची धक्कादायक बातमी. डेक्कन क्वीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये चक्क अळ्या सापडल्या आहेत. पुण्यातले सागर काळे १९ जुलैला मुंबईहून पुण्याला येत होते. त्यांनी डेक्कन क्वीनमध्ये आम्लेट मागवले. त्यासोबत देण्यात आलेल्या मीरपूडच्या पाकिटात अळ्या होत्या. याविषयी तक्रार करुनही तिथल्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. 

रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता याबाबत काय कारवाई केली होणार याची उत्सुकता आहे. डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस पुणे-मुंबई दरम्यान धावते. या एक्सप्रेसमधून दररोज अनेक जण पुणे ते मुंबई रोज प्रवास करत आहेत.