पुणे आणि नागपुरात उद्यापासून असे असतील नवे नियम

पुणे आणि नागपुरात देखील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, उद्यापासून नवे नियम लागू असणार आहेत.

Updated: May 31, 2021, 09:44 PM IST
पुणे आणि नागपुरात उद्यापासून असे असतील नवे नियम title=

पुणे - महापौर मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद घेऊन आज नव्या नियमांबाबत माहिती दिली. 1 जूनपासून म्हणजेच उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ सगळी दुकानं ( सोमवार ते शुक्रवार ) सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, इतर सेवा मात्र बंद राहतील.

पुण्यातील हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक, सलून दुकानं, गार्डन, स्विमिंग टॅंक, जिम, सार्वजनिक कार्यक्रम होणारी ठिकाणं ही बंदच राहणार आहेत. हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा सुरु राहिल. 

नागपुरात देखील काहीसे असेच निर्बंध लागू असतील. 

1. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सातही दिवस सुरू असतील.

2. जीवनावश्यक गटात न येणारी (नॉन ऐसेन्सियल, स्टॅड अलोन ) एकटी दुकाने ७ ते २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. मॉल बंद असेल.

3. कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी ७ ते २ सुरु असतील.

4. खाद्य पदार्थ, मद्य, ई - कॉमर्स व आवश्यक. सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

5. माल वाहतूक सुरू असेल.

6. मार्निंग वॉक, आऊट डोअर, स्पोर्टस बंद असेल.

7. सर्व सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीत सुरू असेल.

8. सर्व खाजगी कार्यालये बंद असतील.

9. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील.