खुषखबर : सिडकोच्या तब्बल १४ हजार ८६८ घरांची सोडत

Updated: Aug 10, 2018, 07:25 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिडकोच्या तब्बल १४ हजार ८६८ घरांची सोडत १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तळोजा, खासघर, घणसोली, कळंबोली, द्रोणागिरी इथं ही घरं आहेत. आर्थिक दुर्बल घटक अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असून त्यांच्या किंमती १८ ते २६ लाखांच्या दरम्यान आहेत. यामध्ये तळोज्यात सर्वाधिक ८ हजार ५०० घरं आहेत.

पुढच्यावर्षी ताबा 

२०१९ पर्यंत घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचं सिडकोनं जाहीर केलंय. सोडत जाहीर झाल्यानंतर अर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू होईल.