मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लुटणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

नवी मुंबई परिसर आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एकट्या-दुकट्या प्रवाशाला लुटणारी परप्रांतीय टोळी...

Updated: Sep 8, 2018, 07:28 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लुटणारी परप्रांतीय टोळी जेरबंद title=

मुंबई : नवी मुंबई परिसर आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एकट्या-दुकट्या प्रवाशाला लुटणारी परप्रांतीय टोळी कार्यरत होती. या टोळीने दोन महिन्यात अनेक जणांना लुटलंय. आरोपींना पकडण्यात नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे विभागाच्या युनिट- २ ला यश आले आहे. पाहूया आरोपींची मोडस ऑपरेंडी आणि तक्रारदारांची आपबीती सांगणारा झी 24 तासचा एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट..

नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहणारे एच.ऐ.आगवणे. एमटीएनएलमधील कर्मचारी आहेत. मुलीच्या कॉलेज प्रवेश करीता १९ जुलैला सायंकाळी पुणे येथे जायला निघाले होते. नेरुळ येथील सायन-पुणे हायवेवर बसची वाट बघत होते. यावेळी लुटारू पांढऱ्या रंगाच्या अॅसेन्ट कारमध्ये आले. आगवणे यांना पुण्याला जायला लिफ्ट दिली. कार नेरुळहुन बेलापूरला पोहचताच पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून १३ हजार रुपये आणि सोन्याची चेन काढून घेतली.

आगवणे यांच्या प्रमाणेच संतोष राठोड या तरुणाला अशाच प्रकारे लुटले. संतोष २२ जूनला सातारा येथे आपल्या गावी जाण्यासाठी नेरुळ हायवेवर उभा होता. आरोपींनी कारमध्ये घेतलं. पुढे एक्स्प्रेस मार्गावर न जाता पनवेलकडे गाडी नेली. पिस्तूल दाखवून, मारहाण करत ATM कार्ड घेतले. त्यातून ६५ हजारांची रक्कम काढली. सोन्याची साखळी घेत डोळ्याला पट्टी बांधून तब्ब्ल चार तास गाडीतून फिरवलं.