close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचा परवाना निलंबित करणाऱ्या अधिकाऱ्याचेच निलंबन

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा परवाना निलंबित करणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.

Updated: Sep 8, 2018, 04:57 PM IST
पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचा परवाना निलंबित करणाऱ्या अधिकाऱ्याचेच निलंबन

बीड : भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा परवाना निलंबित करणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.अभिमन्यू केरुरे या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अतिरिक्त आयुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. 

डिसेंबर महिन्यामध्ये परळी येथील वैद्यनाथ साखर कारखाण्यात रसाची टाकी फुटून झालेल्या अपघातात ७ कामगार ठार झाले होते. त्यानंतर या कारखान्याचा परवाना ११ ते २० एप्रिल दरम्यान निलंबित करण्यात आला होता. बीडचे अतिरिक्त आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी ही कारवाई केली होती. दरम्यान मंत्र्यांचा कारखाना असतानाही त्याचा परवाना निलंबित करणे या अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठांनी केरुरे यांच्यावर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.

परळीजवळील पांगरी येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर २०१७ रोजी ऊसाच्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक कामगार जखमी झाले होते. कारखान्यातील दुर्घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी कारखान्याची तपासणी केली होती. तपासणी दरम्यान कारखान्यात अनेक त्रूटी असल्याचं आढळून आल्याने कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला होता.  दुर्घटनेनंतर रद्द करण्यात आलेला कारखान्याचा परवाना पुन्हा देण्यात आला आहे.