कोल्हापूर : कोल्हापुरात डॉल्बी विरोधात जोरात मोहीम सुरु झाली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी डॉल्बी मालक आणि डॉल्बी वापरणा-या मंडळाना १४४ कलम लावलय.
डोल्बी मालकानी पोलिसांकडे रीतसर डॉल्बी जमा न केल्यास डॉल्बी जप्त करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले होते.
तसंच शहरात डॉल्बी लागल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार राहातील असं ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी तीन दिवस कोल्हापूर शहरात डॉल्बी लावण्याला विरोध केला आहे.
दरम्यान, आज कोल्हापूरातील नागरिकांनी डोल्बी विरोधात मुक मोर्चा काढून प्रसासनाच्या निर्णयाच समर्थन केलं.. कोल्हापूरातील मीरजकर तिकटी इथुन डॉल्बी विरोधातील मोर्चाला सुरुवात झाली.