नोटा लोकशाहीला घातक - चंद्रकांत पाटील

 नोटा लोकशाहीला घातक आहे. 

Updated: Oct 8, 2019, 02:10 PM IST
नोटा लोकशाहीला घातक - चंद्रकांत पाटील title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : नोटा लोकशाहीला घातक असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मतदारांनी नोटा मताचा वापर न करता उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. कोल्हापुरात पथसंचलनानंतर बोलत होते. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटा वापरण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

कोल्हापूरच्या शाहजी लॉ कॉलेजच्या मैदानात संघाचा विजयादशमी उत्सव सुरूय. या उत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. संघाच्या गणवेशात स्वयंसेवकांसोबत चंद्रकांत पाटील देखील पथसंचलनात सहभागी झालेत. 

दरम्यान, विजयादशमी निमित्त आज मालेगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन पार पडले. मालेगावात संघाच्या पथ संचालनाची परंपरा आहे. राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नव्या वेशात अर्थात फुल पँन्टमध्ये संचलन पार पडल्याने स्वयंसेवकात वेगळाच उत्साह होता. मालेगावच्या भुईकोट किल्लातुन संचालनाला सुरुवात झाली शहरातील प्रमुख  मार्गाने संचलन पुन्हा भुईकोट किल्ल्यात पथ संचालनाची  सांगता झाली. संचलन मार्गात नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.