आता मुंबईचा महापौर भाजपचाच- राम कदम

मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असा विश्वास भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केला

Updated: Dec 8, 2019, 07:55 PM IST
आता मुंबईचा महापौर भाजपचाच- राम कदम title=

मुंबई : मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार आहे. त्यादृष्टीनं मजबूत तयारी सुरू आहे. गेल्या वेळेला आम्ही एक ते दोन जागावर कमी पडलो होतो मात्र आता मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असा विश्वास भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार स्थापन होऊन 11 दिवस झाले. यांना खातेवाटप करता आले नाही. मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा विचार हे सरकार करत आहे. त्याचे कारण म्हणजे फार मोठा गट फुटेल ही भीती या सरकारला आहे.  

आता सरकार स्थापन झाले तरी यांच्यामध्ये भीती आहे. हे विकास विरोधी सरकार आहे. कंत्राटदारानी यांना भेटावं असे यांना वाटत आहे का? तसेच कंत्राटदारांनी यांना का भेटावे? विकासाची कामे यांना थांबवता येणार नाही. या सरकारचा आम्ही निषध करतो.ठेकेदारांनी येऊन भेटावे म्हणून सरकार प्रकल्प थांबवत असल्याचे कदम म्हणाले. 

गेल्या पाच वर्षातील विकास कामांना स्थगिती देऊन महाविकास आघाडी कंत्राटदार आपल्याकडे येण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विकास कामांना स्थगिती देणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. एकनाथ खडसे हे भाजप चे नेते आहेत. एकनाथ खडसे हे भाजप मध्ये सक्रिय असल्याचेही ते म्हणाले. 

नाथाभाऊ आमचेच 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकी आधीपासूनच पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलूनही दाखवली आहे. ते भाजप सोडणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावरही चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिय दिली. नाथाभाऊ हे ७८-७९ पासून भाजपमध्ये काम करत आलेत. जी भाजपची ताकद वाढलीय त्यात अनेकांबरोबर नाथाभाऊंचेही योगदान आहे. ते आमचे नेते आहेत. ते असा विचार करणार नाहीत. रागावण्यासारख्या भावना निर्माण झाल्या. त्यांचे काल सर्व काही ऐकले असल्याचे पाटील म्हणाले. आपण जयंत पाटील काय बाेलतात, त्याकडं लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले.