नागपुरात लाजिरवाणा प्रकार; अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण, डॉक्टरांसह व्यापारी सहभागी

Nagpur Police Raid: पवनी अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. रिसॉर्टच्या एका रॉयल हॉलमध्ये हे अश्लील डान्स सुरु होता. 

Updated: Jun 1, 2023, 04:06 PM IST
नागपुरात लाजिरवाणा प्रकार; अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण, डॉक्टरांसह व्यापारी सहभागी title=
Nagpur Resort Police Raid

Nagpur Police Raid: नागपूरच्या उमरेडच्या पवनी अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिरखुरा शिवारातील टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला. विशेष म्हणजे यात नामवंत डॉक्टरसह उद्योगपतींचा समावेश आहे.रिसॉर्टच्या एका रॉयल हॉलमध्ये हे अश्लील डान्स सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी रिसॉर्टवर धाड टाकली. दरम्यान, मोठमोठ्यानं डीजे वाजवत मुलींच्या अश्लील डान्सवर पैशांची उधळण करत असल्याचं यावेळी दिसून आलं. याप्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये साऊंड सिस्टमसह 1 लाख 30 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. 

रिसॉर्टवर अश्लील नृत्य करणाऱ्या 12 जणांना अटक 

पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी रिसॉर्टवर बेकायदेशीर दारु सेवन करणारे आणि अश्लील नृत्य करणाऱ्या 12 जणांना अटक केली. यात सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायकबाब म्हणजे यात डॉक्टर आणि मोठे व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. रिसॉर्टच्या एका शाही हॉलमध्ये अश्लील डान्स सुरू होता. दुसरीकडे या डान्सवर हवेत पैसे फेकल्या जात होते. रिसॉर्टवर रात्री 1.45 च्या सुमारास छापा टाकण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

3.72 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काही महिला अश्लील पद्धतीने नाचत होत्या, तर काही पुरुष मंडळी त्यांच्यावर चलनी नोटांचा वर्षाव करत होते. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 1.60 लाख रुपये किमतीची डीजे साउंड सिस्टीम, 5,000 रुपये किमतीचे स्मोक मशीन, 7,000 रुपये किमतीचे स्टॅबिलायझर, 5,000 रुपये किमतीचे साउंड लेव्हल मशीन, 12,000 रुपये किमतीचे अ‍ॅम्प्लीफायर, 5,000 रुपये किमतीचे साउंड मिक्सर, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला. तसेच विदेशी दारुच्या अनेक बाटल्या असा एकूण 1,30,300 रुपये किमतीचा माल जप्त केला. या मालाची एकूण अंदाजे किंमत 3.72 लाख रुपये आहे, असे पोलिसांनी सांगितले.