अनिरुद्ध दवाळे / अमरावती : विदर्भाचा कॉलिफोर्निया म्हणून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील संत्राची (Orange) ओळख आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती (Amravati Farmers) जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात संत्राच सर्वाधिक उत्पादन (Orange Farmers growers) घेतले जात. मात्र संत्राचा मृग बहार आल्यानंतर संत्रे कवडीमोल भावात विकले जात आहे. मागील वर्षी ३० हजार रुपये टनांनी विकला जाणारा संत्रा यंदा १२ हजारांनी घ्यायला कुणी व्यापारी तयार नाही, अशी परिस्थिती आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुका म्हणजे विदर्भाचा कॅलिफोर्नियाच. कारण या भागात सर्वाधिक उत्पादन ही संत्राचे घेतले जाते. याच भागातील संत्र्यामुळे नागपूर 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखली जाते. परंतु याच भागातील शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. मागील वर्षी ३० हजार रुपये प्रति टनांनी विक्री होणारा संत्रा यंदा मात्र केवळ १० हजार रुपये टनांनी विकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे, अशी माहिती वरुड येथील संत्रा उत्पादक शेतकरी गुलाब टेंभे यांनी दिली.
गतवर्षी मोर्शी, वरुड या परिसरात पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे अनेकांनी आपली संत्राची झाडे मोडली. मात्र उर्वरित संत्रा उत्पादकांनी कठीण परिस्थितीमध्ये झाडे जगविली. यातून मार्ग काढीत संत्राला चांगला भाव येईल या आशेत शेतकरी होता. मात्र अचानक संत्राचे भाव कोसळले. आणि शेतकऱ्यांची संत्रे शेतातच राहिली. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी ज्याप्रमाणे सोयाबीन, कपाशी याला हमीभाव ठरवून दिला तोच हमीभाव संत्राला सुद्धा द्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे, याबाबत शेतकरी राजू ढोरे यांनी तशी मागणी केली आहे.
संत्रा तयार करण्यासाठी प्रती झाड ३५० रुपये म्हणजे असा एकूण १२ लाख खर्च झाला तर आता त्यांचा संत्रा बगीच्या पूर्णपणे बहरला आहे. मात्र व्यापारी केवळ १२ ते १४ हजार टन भाव मागत आहे. त्यामुळे २५ ते ३० हजार रुपये टन भाव असलेला संत्रा कवडीमोलभावात विकला जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर आधीच निसर्गाने घाला घातला. आता संत्रा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.