साताऱ्यात बगाड यात्रेचं आयोजन; प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला

साताऱ्यातील बगाड यात्रेमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला...

Updated: Apr 2, 2021, 09:46 AM IST
साताऱ्यात बगाड यात्रेचं आयोजन; प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला

 सातारा : राज्यात  कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू असूनही काही जिल्ह्यांमध्ये  कोरोन प्रतिबंध नियमांचे पालन न होत असल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यातील बसवत बावधनमध्ये बगाड यांत्रेचं आयोजन करण्यात आली होती. या यात्रेतील प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचे तीने तेरा वाजवले.

 साताऱ्यात बसवत बावधनमध्ये कोरोना नियमांना धाब्यावर बसवत बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेतील प्रचंड गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असताना देखील यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बगाड यात्रेचं लौकिक आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करत बगाड काढले आहे.