येवला : संक्रांतीच्या तीन दिवसाच्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजानं दुर्मिळ झालेल्या घुबडावर संक्रांत आलीय.
येवला शहर हे संक्रातीच्या पतंगोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पतंगासाठी वापरला जाणाऱ्या नॉयलॉन मांजा हा एका घुबडाच्या जीवावर बेतणारा ठरला होता.
संक्रातीच्या भोगीच्या दिवशी सकाळी सकाळी नॉयलॉन मांज्यात एक दुर्मिळ प्रजातीचे घुबड गुरफटलं गेलं.
गुंतलेल्या या घुबडावर कावळ्यांनी हल्ला केला, यात घुबडाला काही स्थानिक नागरिकांनी वाचवून त्याच्या पायात गुंतलेला नॉयलॉन मांजा सोडवला आहे.
स्थानिक नागरिकांनी या घुबडावर प्रथमोपचार करून वनविभागाच्या स्वाधिन केले.