पालघरमधल्या घरात घुसला १३ फूटी अजगर , कोंबड्यावर मारला ताव

सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फुटी अजगर आढळलाय.

Updated: Aug 20, 2018, 11:04 PM IST

पालघर : पालघर जिल्ह्यातील सावटा गावातील घुंगरुपाडा इथल्या सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फुटी अजगर आढळलाय. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरातल्या कोंबड्यांचा आवाज आल्यावर दुबळा यांना जाग आली. यावेळी अजगराने एक कोंबडी फस्त केली.

वनविभागाच्या हवाली  

यानंतर  वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनला हा सगळा प्रकार कळवण्यात आला. दोन्ही सर्पमित्रांनी १३ फूट लांब आणि २२ किलो वजनाच्या नर जातीच्या अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केलंय.