कार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेला वारकऱ्यांचा विरोध

आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीला (Ashadhi Kartiki Wari) सरकार निर्बंध घालणार असेल, तर.. 

Updated: Nov 21, 2020, 04:16 PM IST
कार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेला वारकऱ्यांचा विरोध

पंढरपूर : आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीला (Ashadhi Kartiki Wari) सरकार निर्बंध घालणार असेल. तसेच प्रतिकात्मक स्वरूपात कार्तिकी वारी साजरी करायचं आवाहन सरकार वारकरी संप्रदायाला करणार असेल, तर सरकारने सुद्धा पंढरपूर (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी (Vitthal-Rukmini Karthiki Ekadashi) एकादशी शासकीय महापूजा (Government Mahapuja) प्रतिकात्मक रूपातच करावी, अशी थेट आक्रमक भूमिका, वारकरी समन्वय समितीने घेतली आहे. 

याद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शासकीय महापूजेला वारकरी समन्वय समितीनं विरोध केला आहे. पंढरपुरात कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊ नये. त्याऐवजी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांद्वारे शासकीय महापूजा करण्यात यावी, अशी मागणी वारकरी समन्वय समितीने केली आहे.

तसेच सर्वांना एकच न्याय लावण्यात आला असे वाटेल, अशी आग्रही भूमिका वारकरी समन्वय समितीने मांडली. पंढरपुरातल्या वासकर वाड्यात झालेल्या बैठकीत वारकरी संप्रदायानं, निवडणूक आणि मतदानावर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला.