मजुर आणि उद्योजकांना, नोकदारांना विश्वास देणं आवश्यक - पंकजा मुंडे

लॉकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाराची,अर्थव्यवस्थेविषयी व्यक्त केली चिंता   

Updated: Apr 10, 2021, 09:13 PM IST
मजुर आणि उद्योजकांना, नोकदारांना विश्वास देणं आवश्यक - पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवाय सर्वांनी नियमांचं पालन करण्याची आणि सहकार्य करण्यासाठी आवाहन केलं आहे. कोरोना परिस्थिती बाबत  मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊन बाबत सुचक वक्तव्य केलं आहे. 

पंकजा मुंडे ट्विट करत म्हणाल्या, 'लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची,अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरनीची साखळी कशी तोडणार? मजुर आणि उद्योजकांना  नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.'

काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन महिन्यांचा लॉकडाउन म्हणत नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.