नवाब मलिक यांचा परमबीर यांच्यावर निशाणा, अँटिलिया प्रकरणाचा कट सचिन वाझेबरोबर रचला

अँटिलिया स्फोटक प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिका यांनी नवा आरोप केला आहे.  

Updated: Dec 1, 2021, 01:05 PM IST
नवाब मलिक यांचा परमबीर यांच्यावर निशाणा, अँटिलिया प्रकरणाचा कट सचिन वाझेबरोबर रचला

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिका यांनी नवा आरोप केला आहे. मलिक यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai police commissioner Param Bir Singh) यांच्यावर निशाणा साधताना अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा कट सचिन वाझे (dismissed cop Sachin Waze) याच्याबरोबर रचला गेला, असा दावा केला आहे. याबाबत मलिक यांनी ट्विट केले आहे. ( Param Bir Singh and   Sachin Waze had planned the bomb threat  - Nawab Malik)

नवाब मलिक यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कटकारस्थान परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी मिळून केले आहे. हे सगळे राजकीय हेतूने प्रेरित आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलियासमोर बॉम्ब ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएला (National Investigation Agency-NIA) सचिन वाझे याच्या घरातून पासपोर्ट मिळाला आहे. ज्यावर पाकिस्तानात ये-जा करण्यासाठी बनावट स्टॅम्प लावले होते. पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, परमबीर सिंह आणि सचिन वाजे यांनी अँटिलिया  अँटिलिया स्फोटक प्रकरणाची घटना घडवून आणली होती.

या दोघांनी मनसुख हिरेनच्या बनावट चकमकीची योजना आखली आणि त्याच्या पाकिस्तानात जाण्या-येण्याचे बनावट शिक्के असलेला पासपोर्ट तयार केला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. एनआयएने हा पासपोर्ट सचिन वाझे याच्या घरून बनावट शिक्क्यांसह जप्त केला होता. पाकिस्तानात जाण्यासाठी तो तयार करण्यात आला होता. अँटिलिया स्फोटक प्रकरणातील एका मोठ्या कटाचा तो भाग होता. पुण्यात पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी हे आरोप केले. भविष्यात खूप धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, असेही नवाब मलिक म्हणाले.