मुलगी प्रेमात पडली, यानंतर आईवडील चुकले आणि थेट जेलमध्ये गेले

अल्पवयीन मुलगी प्रेमात पडली हे आईवडिलांना पचलं नाही, पण त्यानंतर जगाला न पटणारं कृत्य त्यांनी केलं...

Updated: May 2, 2022, 05:34 PM IST
मुलगी प्रेमात पडली, यानंतर आईवडील चुकले आणि थेट जेलमध्ये गेले title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील कराड तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून करून मृतदेह डोंगरावर पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलीचं प्रेमप्रकरण असल्याचा संशय आई वडिलांना होता. यावरुन संतापलेल्या आई-वडिलांनी मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका माळरानावर पुरला. धक्कादायक म्हणजे मुलीची हत्या करुन वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात पोलिसांना मुलीच्या वडिलांवरच संशय वाढला. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आपणच मुलीचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

मुलीचा खून करुन आई-वडिलांनी तिचा मृतदेह पवारवाडी इथल्या डोंगरावर पुरला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.